Royal Enfield Price Cut : भारतीय बाजारात लोकप्रिय असलेली मोटरसायकल कंपनी Royal Enfield ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. भारत सरकारने मोटरसायकल्सवरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी केल्यामुळे, कंपनीने आपल्या 350cc सेगमेंटमधील सर्व बाईक्सच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे.
या निर्णयामुळे Royal Enfield च्या अनेक मॉडेल्सची किंमत 19,000 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
मॉडेलनुसार नव्या किमती (Royal Enfield Bikes New Price)
नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर Royal Enfield च्या 350cc रेंजमधील Hunter, Bullet, Classic आणि Meteor या मॉडेल्सच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
1. Hunter 350: या मोटरसायकलच्या किमतीत 12,260 रुपयांपासून ते 14,867 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. आता Hunter 350 ची सुरुवातीची किंमत 1.37 लाख रुपये झाली आहे.
2. Bullet 350: Bullet 350 च्या किमतीत 14,464 रुपयांपासून ते 18,057 रुपयांपर्यंतची घट झाली आहे. याच्या टॉप-एंड ब्लॅक गोल्ड व्हेरियंटची किंमत आता 2.02 लाख रुपये झाली आहे.
3. Classic 350: Classic 350 च्या किमतीत 16,135 रुपयांपासून ते 19,222 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. याचे रेडडिच SC व्हेरियंट आता 1.81 लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर टॉप-स्पेक एमराल्ड ग्रीनची किंमत 2.15 लाख रुपये झाली आहे.
4. Meteor 350: Meteor 350 च्या सर्व व्हेरियंटच्या किमतीत 17,037 रुपयांपासून ते 19,024 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. याच्या फायरबॉल व्हेरियंटची किंमत आता 1.91 लाख रुपये आणि टॉप व्हेरियंटची किंमत 2.13 लाख रुपयांपर्यंत झाली आहे.
5. Goan 350: नुकत्याच लॉन्च झालेल्या Goan 350 च्या किमतीतही 19,500 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.
या किमतीतील कपातीमुळे Royal Enfield च्या बाईक्स आता ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या ठरतील.
हे देखील वाचा – दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा