RRB NTPC Exam Schedule 2025 | रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB NTPC Exam) एनटीपीसी (नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज) पदभरतीसाठी पदवीधर स्तराच्या परीक्षेचे (Graduate Level Exam) वेळापत्रक लवकरच जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उमेदवार आतुरतेने या (Exam Schedule 2025) वेळापत्रकाची वाट पाहत आहेत, परंतु अद्याप अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.
ज्या उमेदवारांनी पदवीधर स्तराच्या पदांसाठी नोंदणी केली आहे, ते संबंधित प्रादेशिक (Railway Recruitment Board) आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सूचना पाहू शकतात. परीक्षेची शहर स्लिप (Exam City Slip) परीक्षेच्या 10 दिवस आधी जाहीर केली जाईल, तर प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा सुरू होण्याच्या 4 दिवस आधी उपलब्ध होईल.
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern):
आरआरबी एनटीपीसी परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. पहिला टप्पा सीबीटी (संगणक आधारित चाचणी) असेल आणि तो सर्व पदांसाठी समान असेल. सीबीटीमध्ये 90 मिनिटांचे एक पेपर असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील. यामध्ये 40 सामान्य ज्ञान , 30 गणित (, आणि 30 सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशास्त्रचे प्रश्न असतील. पहिल्या टप्प्यातील सीबीटीचा नॉर्मलाइज्ड स्कोअर वापरून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यातील सीबीटी देखील 90 मिनिटांचे असेल आणि त्यात 120 प्रश्न असतील. यामध्ये 50 सामान्य ज्ञानाचे, 35 गणिताचे, आणि 35 सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशास्त्राचे प्रश्न असतील.
पहिला टप्पा सीबीटीसाठी अपेक्षित शिफ्ट वेळ (Expected Shift Timings for CBT 1):
अर्जदारांची मोठी संख्या लक्षात घेता, (RRB NTPC Exam) सीबीटी 1 परीक्षा अनेक शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. प्रत्येक दिवशी तीन शिफ्ट असतील.
- सर्वप्रथम (Railway Recruitment Board)च्या अधिकृत वेबसाइटवर जा.पहिली शिफ्ट सकाळी 9:00 ते 10:30 पर्यंत (रिपोर्टिंग वेळ: सकाळी 7:30)
- दुसरी शिफ्ट दुपारी 12:45 ते 2:15 पर्यंत (रिपोर्टिंग वेळ: सकाळी 11:15)
- तिसरी शिफ्ट सायंकाळी 4:30 ते 6:00 पर्यंत (रिपोर्टिंग वेळ: दुपारी 3:00)
परीक्षेचे वेळापत्रक कसे तपासावे (How to check RRB NTPC Exam Schedule 2025):
- सर्वाद आधी आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होम पेजवर दिलेल्या “आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2025 वेळापत्रक लिंक”वर क्लिक करा.
- स्क्रीनवर (Exam Schedule 2025) वेळापत्रक उघडेल.
- वेळापत्रक डाउनलोड करा.
- वेळापत्रकाची प्रिंटआउट घ्या.
आरआरबी एनटीपीसी रिक्त जागा तपशील (RRB NTPC Vacancy Details):
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 11,558 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक पदे पदवीधर स्तरावरील आहेत आणि 3,445 पदे अंडर ग्रॅज्युएट स्तरावरील आहेत. ही भरती सरकारी (Government Jobs) नोकऱ्यांसाठी एक मोठा संधी असू शकते .