Samsung Galaxy F05 Offer: तुम्ही स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ॲमेझॉनवर सध्या सुरू असलेल्या सेलमध्ये Samsung Galaxy F05 या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे.
5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत सध्या 6,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. सॅमसंगच्या या बजेट स्मार्टफोनवर मिळणाऱ्या या खास डीलबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Samsung Galaxy F05 वरील ऑफर
Samsung Galaxy F05 (4GB+64GB) ची मूळ किंमत 6,549 रुपये आहे. परंतु, जर तुम्ही विविध बँकांच्या कार्डचा वापर केला, तर कंपनी 654 रुपयांचा तात्काळ बँक डिस्काउंट देत आहे. या सवलतीमुळे फोनची किंमत कमी होऊन फक्त 5,895 रुपये इतकी होते. याव्यतिरिक्त, जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करून अतिरिक्त सूट मिळवू शकता.
Samsung Galaxy F05 चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: यात 6.7-इंचचा HD+ डिस्प्ले दिला आहे.
- कॅमेरा: 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर (मागील); 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
- प्रोसेसर: फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरसह येतो.
- रॅम: 4GB (व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने 8GB पर्यंत वाढवता येते)
- स्टोरेज: 64GB (1TB पर्यंत वाढवता येते)
- बॅटरी: 5000mAh ची बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
तुम्ही जर नियमित वापरासाठी फोन शोधत असाल तर Samsung Galaxy F05 चा नक्कीच विचार करू शकता.