Samsung Galaxy S24 Ultra 5G Offer: तुम्ही जर प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला सॅमसंग गॅलेक्सी एस24 अल्ट्रा 5G (Samsung Galaxy S24 Ultra 5G) आता फ्लिपकार्टच्या ‘फ्रीडम सेल’मध्ये (Flipkart Freedom Sale) मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 1,29,999 रुपये होती, पण आता फोन तुम्हाला 81,960 रुपयांमध्ये मिळू शकतो. तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतला, तर त्याची किंमत 80,000 रुपयांपेक्षाही कमी होऊ शकते.
फ्लिपकार्टवर मिळतेय मोठी सूट
फ्लिपकार्टवरील ‘फ्रीडम सेल’मध्ये हा फोन 81,960 रुपये किंमतीत उपलब्ध आहे.म्हणजेच तुम्हाला थेट 48,039 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते.
एक्सचेंज बोनस: तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असल्यास, तुम्ही 66,100 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळवू शकता.
ईएमआय पर्याय: 13,660 रुपये प्रति महिनापासून सुरू होणारे सोपे ईएमआय (EMI) पर्याय देखील उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy S24 Ultra ची वैशिष्ट्ये
- प्रोसेसर आणि रॅम: यात फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर असून तो 12GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज (Storage) पर्यायांसोबत येतो.
- कॅमेरा: या फोनमध्ये 200MP वाइड सेन्सर, 50MP टेलिफोटो, 10MP झूम आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सरचा क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
- डिस्प्ले: यात 6.8 इंचाची क्यूएचडी+ एमोलेड स्क्रीन असून, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्स ब्राइटनेसची सुविधा आहे.
- बॅटरी: या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
हा फोन मोबाईल फोटोग्राफी, कंटेंट क्रिएशन आणि मल्टीटास्किंग करणाऱ्या युजर्ससाठी खूप खास आहे. यात एस पेनचा (S Pen) सपोर्टही मिळतो.