तुमच्या आधार कार्डवर इतर कोणी सिम कार्ड घेतले आहे का? घरबसल्या एका क्लिकवर जाणून घ्या

Sim Cards on Aadhaar

Sim Cards on Aadhaar: मोबाइल नंबरच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक केली जाते. अनेकदा दुसऱ्याच्या ओळखपत्राचा (Sim Cards on Aadhaar) वापर करून सिम कार्ड काढले जाते व याचा वापर बेकायदेशीर कामांसाठी केला जातो. मात्र, यामुळे भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

तुमचे आधार कार्ड वापरून इतरांनी तर सिम कार्ड घेतलेले नाही ना, हे तुम्ही जाऊ शकता. यासाठी सरकारने ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) नावाचे एक नागरिक-केंद्रित पोर्टल सुरू केले आहे.

‘संचार साथी’ पोर्टलचा वापर कसा कराल?

‘संचार साथी’ हे मोबाईल ॲप आणि अधिकृत वेबसाइट (www.sancharsaathi.gov.in) अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. यावर तुम्ही तुमच्या ओळखपत्रावर किती मोबाइल कनेक्शन सक्रिय आहेत, हे तपासू शकता आणि तुम्हाला माहीत नसलेले किंवा अनावश्यक नंबर बंद करण्यासाठी विनंती करू शकता.

तुमच्या नावावर असलेले मोबाइल नंबर तपासण्याची प्रक्रिया:

  • सर्वात आधी sancharsaathi.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  • ‘नागरिक-केंद्रित सेवा’ (Citizen-centric services) वर क्लिक करा.
  • ‘तुमच्या नावावर किती मोबाइल कनेक्शन आहेत ते जाणून घ्या’ (Know Mobile Connections In Your Name) हा पर्याय निवडा.
  • तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड (Captcha Code) एंटर करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून पडताळणी करा.

ही सेवा अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर असलेल्या ‘संचार साथी’ मोबाईल ॲपद्वारे देखील उपलब्ध आहे.

अनोळखी नंबर आढळल्यास काय करावे?

जर तुम्हाला तुमच्या नावावर एखादा अनोळखी नंबर आढळला, तर तुम्ही तो निष्क्रिय करण्यासाठी थेट पोर्टलवरून विनंती करू शकता. यानंतर, तुम्हाला तुमच्या टेलिकॉम कंपनीशी संपर्क साधून तो नंबर पूर्णपणे बंद झाला आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.