नवीन लुक आणि फीचर्स! Tata Altroz Facelift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Tata Altroz Facelift |

Tata Altroz Facelift | टाटा मोटर्सने (Tata Motors) अखेर त्यांची लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजचे (Altroz) फेसलिफ्टेड मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे. मारुती बलेनो, टोयोटा ग्लान्झा आणि ह्युंदाई आय20 यांना टक्कर देणारी ही गाडी विविध रंग, व्हेरियंटआणि पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असेल.

अल्ट्रोज फेसलिफ्टच्या बाह्य डिझाइनमध्ये नवीन फ्रंट आणि रिअर बंपर, नवीन ग्रिल, एलईडी हेडलाईट्स, नवीन एलईडी टेल लाईट्स, टेलगेटवर एलईडी लाईट बार, फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स आणि नवीन ड्युअल-टोन व्हील्सयांचा समावेश आहे. ग्राहक ड्युन ग्लो, एम्बर ग्लो, रॉयल ब्लू, प्युअर ग्रे आणि प्रिस्टिन व्हाईट या पाच रंगांमधून निवड करू शकतात.

नवीन टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टच्या इंटिरिअरमध्ये10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, इलेक्ट्रिक सनरूफ, 10.25-इंचाचे फुली डिजिटल कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्स, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि आयआरए कनेक्टेड कार टेक्नोलॉजी यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.

इंजिन पर्यायांमध्ये, 2025 अल्ट्रोज 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर डिझेल इंजिन आणि सीएनजी युनिटसह 1.2-लीटर पेट्रोल इंजिन अशा तीन पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल, पाच-स्पीड एएमटी आणि सहा-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक युनिट्सचा समावेश आहे. स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह, अकम्प्लिश्ड एस (Accomplished S) आणि अकम्प्लिश्ड+ एस (Accomplished+ S) असे एकूण पाच व्हेरियंट उपलब्ध आहेत.

नवीन अल्ट्रोज फेसलिफ्टच्या व्हेरियंटनुसार किंमती (एक्स-शोरूम):

  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल एमटी स्मार्ट: ₹ 6.89 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल एमटी प्युअर: ₹ 7.69 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल एमटी क्रिएटिव्ह: ₹ 8.69 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल एमटी अकम्प्लिश्ड: ₹ 9.99 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल-सीएनजी एमटी स्मार्ट: ₹ 7.89 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल-सीएनजी एमटी प्युअर: ₹ 8.79 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल-सीएनजी एमटी क्रिएटिव्ह: ₹ 9.79 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल-सीएनजी एमटी अकम्प्लिश्ड: ₹ 11.09 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट डिझेल एमटी प्युअर: ₹ 8.99 लाख
  • अल्ट्रोज फेसलिफ्ट डिझेल एमटी अकम्प्लिश्ड एस: ₹ 11.29 लाख

Share:

More Posts