Home / लेख / GST कपातीचा ग्राहकांना फायदा; टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या किमतीत मोठी घट

GST कपातीचा ग्राहकांना फायदा; टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या किमतीत मोठी घट

Tata Motors Price Cut:

Tata Motors Price Cut: वस्तू आणि सेवा कराच्या (GST) दरांमध्ये झालेल्या मोठ्या बदलांनंतर, देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या कारच्या किमती कमी करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

कंपनीने त्यांची सर्वात स्वस्त कार Tata Tiago पासून प्रसिद्ध एसयूव्ही Tata Safari पर्यंत सर्व गाड्यांच्या किमतीत बदल केला आहे. किमतीतील ही कपात 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरातील डीलरशिपवर लागू होईल.

कंपनीच्या ‘कस्टमर फर्स्ट’ या तत्त्वानुसार, टाटा मोटर्स GST कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांना देईल. यामुळे टाटा मोटर्सच्या लोकप्रिय कार आणि एसयूव्ही रेंज अधिक परवडणाऱ्या होतील, ज्याचा फायदा पहिल्यांदाच वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळेल.

कोणत्या कारची किंमत किती कमी झाली?

जीएसटी कपातीमुळे कोणत्या कारची किंमत किती कमी झाली आहे, हे खालीलप्रमाणे:

  • Tata Tiago: 75,000 रुपये
  • Tata Tigor: 80,000 रुपये
  • Tata Altroz: 1,10,000 रुपये
  • Tata Punch: 85,000 रुपये
  • Tata Nexon: 1,55,000 रुपये
  • Tata Curvv: 65,000 रुपये
  • Tata Harrier: 1,40,000 रुपये
  • Tata Safari: 1,45,000 रुपये

जीएसटी कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ज्या छोट्या कारमध्ये 1200cc पर्यंतचे पेट्रोल इंजिन किंवा 1500cc पर्यंतचे डिझेल इंजिन असेल आणि ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा कमी असेल, त्यांच्यावरील जीएसटी आता 28% वरून कमी करून केवळ 18% करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या बदलामुळेच या श्रेणीतील कारच्या किमतीत मोठी घट झाली आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड