Tesla Cybertruck crash test: टेस्लाची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक गाडी Cybertruck ची नुकतीच इन्शुरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी (IIHS) या संस्थेने क्रॅश टेस्ट घेतली. सप्टेंबर 2025 पर्यंत, या संस्थेने फक्त एकाच क्रॅश टेस्टचे निकाल जाहीर केले आहेत.
या चाचणीत Cybertruck ने दमदार कामगिरी केली असली, तरी एका मोठ्या त्रुटीमुळे तिच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
क्रॅश टेस्टमध्ये चांगली कामगिरी
टेस्लाकडून अपेक्षित असल्याप्रमाणे, या क्रॅश टेस्टमध्ये Cybertruck ला सर्वोच्च रेटिंग मिळाली आहे. IIHS च्या सुरक्षा तज्ज्ञांनी Cybertruck च्या मागच्या सीटवरील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. डमीची छाती आणि पेल्व्हिसवर शोल्डर आणि लॅप बेल्ट योग्य स्थितीत राहिले, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, वाहन-विरुद्ध-पादचारी चाचणीत (Vehicle-vs-Pedestrian) Cybertruck च्या फ्रंट क्रॅश प्रतिबंध प्रणालीलाही चांगली रेटिंग मिळाली आहे.
‘ही’ मोठी कमतरता राहिली
क्रॅश टेस्टमध्ये उत्तम रेटिंग मिळाल्यानंतरही Cybertruck मध्ये एक मोठी कमतरता आढळली आहे.
- मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या छातीला दुखापत होण्याचा धोका मध्यम असल्याचे आढळले.
- LATCH प्रणाली (लहान मुलांच्या सीटसाठी) आणि सीटबेल्ट रिमाइंडरच्या वापरासाठी फारसे समाधानकारक रेटिंग मिळाले नाही.
या व्यतिरिक्त, 2025 मॉडेलच्या Tesla Cybertruck शी संबंधित सर्वात मोठी समस्या तिच्या हेडलाइट्समध्ये दिसून आली. IIHS ने यासाठी ‘खराब’ (Poor) रेटिंग दिले आहे.
गाडीचे LED प्रोजेक्टर-स्टाइल फ्रंट लाइट्स खूप जास्त प्रकाश निर्माण करतात आणि काही परिस्थितीत कमी व्हिजिबिलिटी देतात, असे चाचणीत आढळले.
Tesla Cybertruck ची किंमत आणि फीचर्स
ऑगस्ट 2025 मध्ये Tesla Cybertruck ची मूळ किंमत $15,000 (सुमारे 13,17,180 रुपये) वाढवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच, कंपनीने रियर-व्हील-ड्राइव्ह व्हेरियंट रद्द केल्याने, Cybertruck ची सध्याची सुरुवातीची किंमत $79,990 (सुमारे 70,23,961 रुपये) आहे.
लक्स पॅकेज: यात सेल्फ-ड्राइव्हिंग, 4 वर्षांची प्रीमियम सेवा आणि 70,000 हून अधिक सुपरचार्जरवर मोफत सुपरचार्जिंगसारखे फीचर्स मिळतात.
बॅटरी पॅक आणि रेंज: Cybertruck चा AWD व्हेरियंट एका फुल चार्जवर 325 मैल (523 किलोमीटर) ची रेंज देतो आणि 11,000 पाउंड (4,990 किलोग्राम) पर्यंत वजन ओढू शकतो. हा 4.1 सेकंदात 60 मैल प्रति तास (97 kph) इतका वेग पकडू शकतो.
हे देखील वाचा – ‘तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद