Best Budget Cars in India: 5 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये टॉप 5 कार, मायलेज, फीचर्स आणि स्टाईलसह बरचं काही

Best Budget Cars in India: 5 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये टॉप 5 कार, मायलेज, फीचर्स आणि स्टाईलसह बरचं काही

 Best Budget Cars in India: तुम्ही लवकरच कमी बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात 5 लाख रुपयांच्या (Cars Under 5 lakh) आसपास अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या कार्समध्ये ग्राहकांना चांगल्या फीचर्ससोबतच भरपूर मायलेज मिळतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अशाच 5 सर्वात परवडणाऱ्या (Best Budget Cars in India) कार्सबद्दल माहिती घेऊया.

1. मारुती सुझुकी ऑल्टो K10

ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि स्वस्त कारपैकी एक आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत4.23 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखले जाते.

2. टाटा टियागो

मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने टियागो ही एक विश्वासार्ह कार आहे. तिची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये असून ती 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह येते.

3. मारुती सुझुकी एस-प्रेसो

मिनी एसयूव्हीसारखी ही कार उंच ग्राउंड क्लीअरन्स आणि कॉम्पॅक्ट डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 4.26 लाख रुपये आहे. यामध्येही 1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

4. रेनॉल्ट क्विड

स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्स असलेली ही कार 4.70 लाख रुपये किंमतीपासून सुरू होते. यामध्ये 1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन असून मायलेज आणि डिझाइन यांचा उत्तम समतोल आहे.

5. मारुती सुझुकी सेलेरिओ

उच्च मायलेजसाठी ओळखली जाणारी सेलेरिओ ही कार 5.64 लाख रुपये पासून उपलब्ध आहे. यामध्ये पेट्रोलसोबतच सीएनजी इंजिनचाही पर्याय दिला जातो. ही कार 1.0 लिटर इंजिनसह सादर केली जाते.

या सर्व कार्स कमी बजेटमध्ये फीचर्स आणि मायलेज यांचा संतुलित अनुभव देतात. त्यामुळे पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी या उत्तम पर्याय ठरू शकतात.