Top 5 SUV Cars India: सध्या भारतीय बाजारात मिड-साइज एसयूव्ही गाड्या लोकप्रिय आहेत. अनेकजण आपल्या कुटुंबासाठी बजेटमध्ये बसणाऱ्या स्टाइलिश गाड्या शोधत आहेत. जर तुम्हीही अशाच एका गाडीच्या शोधात असाल, तर 15 ते 20 लाख रुपयांच्या बजेटमध्ये काही शानदार पर्याय उपलब्ध आहेत. या गाड्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Kia Seltos
स्टाइलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्ससाठी किआ सेल्टोस ओळखली जाते. ही डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. गाडीचे मायलेज (डिझेल) 20.7 kmpl आणि (पेट्रोल) 16.3 kmpl आहे.
या एसयूव्हीमध्ये 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, BOSE साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड सीट्स आणि लेव्हल 2 ADAS सारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. सेल्टोसची एक्स-शोरूम किंमत 11.19 लाख ते 20.56 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Mahindra Scorpio N
मजबूत बनावट आणि ऑफ-रोडिंग क्षमतेमुळे महिंद्रा स्कॉर्पियो एन नेहमीच चर्चेत असते. ही एसयूव्ही डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 6 एअरबॅग, ADAS, रिअर पार्किंग कॅमेरा, 8-इंच टचस्क्रीन सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay सारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
सोबतच, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स सारखे प्रीमियम फीचर्सही यात मिळतात. याची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख ते 25.62 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Maruti Suzuki Grand Vitara
जर तुम्ही चांगल्या मायलेजचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी ग्रँड विटारा हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी हायब्रीड एसयूव्ही आहे. यात 1.5-लीटर पेट्रोल, हायब्रीड आणि CNG असे तीन पर्याय मिळतात. ग्रँड विटाराचे हायब्रीड मॉडेल 27.97 kmpl पर्यंत मायलेज देते.
या गाडीची एक्स-शोरूम किंमत 11.42 लाख ते 20.68 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात 9-इंच टचस्क्रीन, हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग सारखे फीचर्स आहेत.
Hyundai Creta
हुंडई क्रेटा ही भारतीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही आहे. यात 1.5-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय आहेत. याची मायलेज (डिझेल) 21.8 kmpl आणि (पेट्रोल) 16.85 kmpl आहे.
क्रेटा मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग आणि ADAS सारखे अनेक फीचर्स आहेत. क्रेटाची एक्स-शोरूम किंमत 11.11 लाख ते 20.50 लाख रुपयांदरम्यान आहे.
Honda Elevate
लक्झरी फीचर्स आणि स्पोर्टी डिझाइनमुळे होंडा एलिवेट तरुणांना आकर्षित करते. ही केवळ 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह येते आणि 16.92 kmpl पर्यंत मायलेज देते. याची एक्स-शोरूम किंमत 11.93 लाख ते 16.83 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
या एसयूव्हीमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, 6 एअरबॅग, लेन-कीप असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर आणि ADAS सारखे सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…