Important Traffic Rules : देशातील वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम (Important Traffic Rules) तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंड आकारण्यापासून ते थेट ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते. त्या
मुळे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना अशा कोणत्या चुका आहेत, ज्यामुळे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले जाऊ शकते, हे आपण येथे सविस्तर पाहूया.
- वाहन चालवताना फोनचा वापर: मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), वाहन चालवताना फोनचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई आहे. तुम्हाला नेव्हिगेशनचा वापर करायचा असल्यास गाडी बाजूला थांबवून त्याचा वापर करू शकता. जर तुम्ही वाहन चालवताना फोनचा वापर करताना आढळलात, तर कारवाई होऊ शकते.
- दारू पिऊन गाडी चालवणे (ड्रिंक अँड ड्राइव्ह): हा वाहतूक नियमांपैकी सर्वात गंभीर गुन्हा आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास केवळ मोठा दंड आणि तुरुंगवास होऊ शकत नाही, तर यामुळे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले जाऊ शकते. यामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी लक्षात घेऊन या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
- गाडीत मोठ्या आवाजात संगीत लावणे: मोटार वाहन कायद्यानुसार, गाडी चालवताना खिडक्या उघडून मोठ्या आवाजात संगीत लावणे टाळावे. असे केल्यास तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होऊ शकते.
- झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे: झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी बनवण्यात आले आहे. अनेकदा लोक वाहतूक सिग्नललाआपली गाडी झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्याच्या पुढे उभी करतात. नियमानुसार, गाडी झेब्रा क्रॉसिंगच्या आधीच थांबवणे आवश्यक आहे. हा नियम मोडल्यास मोठा दंड आकारला जातो.
- शाळा-रुग्णालयाच्या परिसरात वेगाने गाडी चालवणे: शाळा किंवा रुग्णालयाच्या आसपासच्या रस्त्यावर गाडी चालवताना तिचा वेग कमी असावा. या ठिकाणी वेगाने गाडी चालवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा अनेक ठिकाणी वेग मर्यादेचे बोर्डही लावलेले असतात. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यासोबतच तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त केले जाऊ शकते.
- ब्लूटूथ कॉलिंगचा वापर: अलीकडील काळात अनेक गाड्यांमध्ये ब्लूटुथ कॉलिंगची (Bluetooth Calling) सुविधा मिळते. याचा फायदा घेऊन अनेक लोक वाहन चालवताना ब्लूटूथवर फोन कॉलवर बोलतात. पण असे करणे वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. ही चूक केल्यास तुमचे चलन (Challan) कापले जाऊ शकते आणि ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त होऊ शकते.
त्यामुळे दंड व ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होणे टाळायचे असल्यास गाडी चालवताना या चुका टाळा.