TVS Ntorq 150: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि स्पोर्टी स्कूटर्सपैकी एक असलेल्या Ntorq 125 च्या यशानंतर, आता TVS ने आपली नवीन आणि अधिक शक्तिशाली स्कुटर TVS Ntorq 150 बाजारात आणली आहे.
कंपनीच्या ICE इंजिनसह ही नवी स्कुटर 0 ते 60 किलोमीटर प्रतितास वेग फक्त 6.3 सेकंदात गाठू शकते. जुन्या मॉडेलपेक्षा अधिक स्पोर्टी लूकसह ही स्कुटर तरुणांना आकर्षित करेल असा कंपनीचा दावा आहे.
TVS Ntorq 150: किंमत आणि डिझाइन
TVS Ntorq 150 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,19,000 रुपये आहे. ही स्कुटर Hero Xoom 160, Yamaha Aerox 155, आणि Aprilia SR 160 सारख्या लोकप्रिय स्कूटर्सना टक्कर देईल. बेस मॉडेल Stealth Silver, Racing Red, आणि Turbo Blue या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
याशिवाय, TFT डिस्प्लेसह टॉप मॉडेलची किंमत 1,29,900 (एक्स-शोरूम) रुपये आहे. हे मॉडेल Nitro Green, Racing Red, आणि Turbo Blue या रंगांमध्ये उपलब्ध असेल.
या स्कुटरचे डिझाइन “स्टील्थ एअरक्राफ्ट” वरून प्रेरित आहे. यात मल्टीपॉइंट प्रोजेक्टर लॅम्प्स, T-आकाराचे LED टेल लॅम्प्स आणि एअर-डायनॅमिक विंगलेट्ससारखे आधुनिक घटक दिले आहेत. चांगल्या नियंत्रणासाठी यात मोटरसायकलसारखे हँडलबार आणि ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे सुरक्षा फीचर्स आहेत.
TVS Ntorq 150: दमदार इंजिन आणि अत्याधुनिक फीचर्स
Ntorq 150 मध्ये 149.7cc चे एअर-कूल्ड O3CTech इंजिन आहे. हे इंजिन 7,000rpm वर 13.2 bhp ची पॉवर आणि 5,500rpm वर 14.2 Nm चा टॉर्क निर्माण करते. 104 kmph चा टॉप स्पीड असलेली ही स्कुटर तिच्या श्रेणीतील सर्वात वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात Street आणि Race असे दोन रायडिंग मोड्स आहेत, जे Ntorq 125 प्रमाणेच आहेत.
टॉप मॉडेलमध्ये TVS SmartXonnect तंत्रज्ञानावर आधारित हाय-रिझोल्यूशन TFT डिस्प्ले दिला आहे, ज्यात 50 हून अधिक कनेक्टेड फीचर्स मिळतात. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, लाइव्ह व्हेइकल ट्रॅकिंग, शेवटचे पार्क केलेले स्थान, आणि कॉल व मेसेज अलर्टचा समावेश आहे. याशिवाय, यात व्हॉईस नेव्हिगेशनसाठी Amazon Alexa सपोर्ट आणि स्मार्टवॉचशी जोडण्याची सुविधा देखील आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मंडल वरून शिवसेना सोडली आता मंत्रिपद सोडणार का? राऊतांचा भुजबळांना सवाल
किम-पुतिन भेटीनंतर जोंग यांच्या ग्लाससह खुर्ची व ठशांची सफाई