Vivo V50e : विवोचा दमदार फोन भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये, फीचर्स पाहून थक्क व्हाल

vivo v50e

Vivo V50e Price-Features | स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन (Vivo V50e) भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. कंपनीच्या V50 मालिकेतील हा दुसरा हँडसेट असून, याआधी फेब्रुवारीमध्ये Vivo V50 हे स्टँडर्ड मॉडेल बाजारात दाखल झाले होते.

नवीन Vivo V50e मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह 8GB RAM दिली असून 5,600mAh क्षमतेची मोठी बॅटरी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगसह येते. हा फोन IP68 आणि IP69 डस्ट-वाॅटर रेसिस्टंट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Vivo V50e चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन 6.77-इंचाच्या फुल-HD+ (1,080×2,392 पिक्सल) क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 300Hz आणि पीक ब्राइटनेस 1,800nits आहे. या डिस्प्लेला SGS लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन, HDR10+ सपोर्ट आणि डायमंड शील्ड ग्लास संरक्षण मिळते.

स्मार्टफोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर, 8GB LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत UFS2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून Android 15 आधारित FuntouchOS 15 वापरण्यात आली आहे. कंपनीने यासाठी 3 वर्षांचे OS अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचं आश्वासन दिलं आहे.

कॅमेरा सेटअप

Vivo V50e मध्ये 50MP Sony IMX882 प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरासह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये Optical Image Stabilization (OIS) आणि Aura Light सारखी फीचर्स आहेत. सेल्फीसाठी, यामध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर वैशिष्ट्ये

स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला असून कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth, OTG, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

भारतात किंमत आणि विक्री

Vivo V50e च्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 28,999 रुपयांपासून सुरू होते, तर 8GB + 256GB व्हेरियंट 30,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा हँडसेट Pearl White आणि Sapphire Blue या दोन रंगांमध्ये येतो. विक्री 17 एप्रिलपासून Amazon, Flipkart आणि Vivo India च्या ऑनलाइन स्टोअरवर सुरू होणार असून सध्या यासाठी प्री-बुकिंग खुलं आहे.