आता डेटा गमावण्याची भीती नाही! WhatsApp लॉगआउट केल्यानंतरही तसेच राहणार चॅट्स

WhatsApp New Feature

WhatsApp New Feature | WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. यूजर्सचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी WhatsApp नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असते. याच प्रयत्नात आता WhatsApp एक नवीन लॉगआउट फीचर आणत आहे, जो अनेक यूजर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

WhatsApp चे नवी लॉगआउट फीचर

आतापर्यंत यूजर्सना WhatsApp वरून पूर्णपणे बाहेर पडायचं असल्यास खाते डिलीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, लवकरच येणाऱ्या या नवीन फीचरमुळे यूजर्स आपला डेटा गमावण्याशिवाय अ‍ॅपमधून लॉगआउट होऊ शकतील.

हा पर्याय यूजर्सना Settings > Account मध्ये दिसेल. लॉगआउट करताना तीन पर्याय उपलब्ध असतील. यूजर्स डेटा डिलीट करू शकतात अथवा डेटा तसाच ठेवून लॉग आऊट करू शकतील.

दुसरा पर्याय निवडल्यास यूजर्सचं चॅट, मीडिया, फाइल्स (files) फोनमध्ये सुरक्षित राहील आणि भविष्यात ते पुन्हा लॉगिन करू शकतील.

iPad साठी अखेर अधिकृत WhatsApp अ‍ॅप

दरम्यान, Meta ने अखेर iPad साठी अधिकृत WhatsApp अ‍ॅप जारी केल्याची घोषणा केली आहे. Apple App Store वर हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आलं. यापूर्वी यूजर्सना iPad वर WhatsApp वापरण्यासाठी वेब व्हर्जनचा आधार घ्यावा लागत होता.

नवीन अ‍ॅपमध्ये 32 लोकांना व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करता येतील, स्क्रीन शेअरकरता येईल, तसेच फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यांमध्ये सहजपणे स्विच करता येईल.

हे अ‍ॅप iPhone, Mac आणि इतर उपकरणांमध्ये संपूर्ण सिंकिंग क्षमतेसह येतं. WhatsApp चा एंड-टू-एंड एन्क्रिप्शन तंत्रज्ञानही कायम राहणार आहे.