iPhone Air Designer: जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन iPhone Air लाँच करून Apple ने तंत्रज्ञान विश्वात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. पण, या नव्या क्रांतीच्या मागे एक महत्त्वाचे नाव म्हणजे अबिदुर चौधरी हे आहे.
अबिदुर चौधरी एक औद्योगिक डिझाइनर असून त्यांनीच या फोनची निर्मिती केली आहे. मूळचे लंडनचे असलेले आणि बांगलादेशी वंशाचे अबिदुर चौधरी सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यरत आहेत.
कोण आहेत अबिदुर चौधरी?
अबिदुर चौधरी यांचा जन्म आणि शिक्षण लंडनमध्ये झाले. प्रॉडक्ट डिझाइन आणि तंत्रज्ञानात पदवी घेतल्यानंतर, त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये इंटर्नशिप केली. जानेवारी 2019 मध्ये त्यांनी Apple मध्ये औद्योगिक डिझाइनर म्हणून काम सुरू केले आणि गेल्या जवळपास सात वर्षांपासून ते कंपनीसोबत जोडलेले आहेत.
या फोनच्या लाँचवेळी चौधरी म्हणाले, “आम्ही असा iPhone बनवण्याचा प्रयत्न केला आहे, जो भविष्याचा एक तुकडा असल्यासारखा वाटेल. हा आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone आहे, ज्यामध्ये Pro ची ताकद आहे.”
त्यांनी आपल्या कामातून iPhone च्या डिझाइनला एका नव्या उंचीवर नेले आहे.
iPhone Air मध्ये काय आहे खास?
अबिदुर चौधरी यांनी डिझाइन केलेला हा फोन फक्त 5.5mm पातळ आहे. तो टिकाऊ टायटॅनियमपासून बनवला असून, पुढील आणि मागील बाजूला Ceramic Shield वापरण्यात आले आहे. Apple नुसार, हा सर्वात जास्त ऊर्जा कार्यक्षम iPhone आहे आणि त्याची बॅटरी दिवसभर सहज पुरते.
iPhone Air हा एक eSIM-ओन्ली हँडसेट आहे, जो iOS 26 वर चालतो. यात 6.5 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, ज्यात 3000 निट्सची पीक ब्राइटनेस आणि ProMotion क्षमता आहे. याचा अर्थ, iPhone 17 च्या इतर मॉडेल्सप्रमाणेच, iPhone Air देखील वापराप्रमाणे 10-120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो.
Apple चा दावा आहे की, 5.6mm जाडी असलेला iPhone Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone मॉडेल आहे. तो 80% रिसायकल केलेल्या टायटॅनियमपासून बनवला आहे. यात पहिल्यांदाच समोर आणि मागील बाजूस Ceramic Shield 2 देण्यात आले आहे, ज्यामुळे तो क्रॅक होण्यापासून चारपट अधिक सुरक्षित आहे. iPhone Air मध्ये Pro मॉडेल्सप्रमाणेच A19 Pro SoC आहे, ज्यात सहा-कोर सीपीयू, सहा-कोर जीपीयू आणि 16-कोर न्यूरल इंजिन आहे.
यात दुसऱ्या पिढीचे Dynamic Caching देखील आहे, ज्यामुळे कामगिरी वाढते. या फोनमध्ये Apple Intelligence फीचर्सचाही सपोर्ट आहे. यात Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि thread क्षमतांसाठी नवीन N1 चिप आहे. तसेच, नवीन C1X मॉडम नेटवर्क स्पीड दुप्पट वेगाने देतो. कॅमेऱ्यासाठी यात 48MP चा मुख्य कॅमेरा आहे. यात 18MP चा फ्रंट Centre Stage कॅमेरा आहे.
Apple ने बॅटरीचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले नसले तरी, एका चार्जवर 27 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकची क्षमता असल्याचा दावा केला आहे. हा फोन 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होतो.
iPhone 17 Air ची किंमत
- iPhone 17 Air 256GB – 1,19,900 रुपये
- iPhone 17 Air 512GB – 1,39,900 रुपये
- iPhone 17 Air 1TB – 1,59,900 रुपये
हे देखील वाचा – अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती