Home / महाराष्ट्र / शिवछत्रपती दुर्ग एक्स्प्रेसचा सोमवारपासून शुभारंभ; सातारा,कराडमध्ये विशेष थांबा असणार

शिवछत्रपती दुर्ग एक्स्प्रेसचा सोमवारपासून शुभारंभ; सातारा,कराडमध्ये विशेष थांबा असणार

सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा मिळावी या उद्देशाने भारतीय रेल्वे बुद्ध सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किटमार्फत...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा मिळावी या उद्देशाने भारतीय रेल्वे बुद्ध सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किटमार्फत शिवछत्रपती दुर्ग एक्सप्रेस सुरू करणार आहे.या रेल्वेचा शुभारंभ सोमवार ९ जून रोजी मुंबईत सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

या रेल्वेने पुणे, सातारा,कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे.ही भारत गौरव ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता सुटून दादर,ठाणे येथे थांबा घेईल.कोकण रेल्वेमार्गाने माणगाव येथे रायगड दर्शन करून पुण्यात पोहचेल.तेथील लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहिल्यानंतर ११ जूनला शिवनेरी किल्ला व त्यानंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर, ज्योतिर्लिंग दर्शन करून १२ जून रोजी साताऱ्यात प्रवेश करेल. या जिल्ह्यात सातारा आणि कराड येथे या गाडीला विशेष थांबा असणार आहे.या जिल्ह्यात प्रतापगड दर्शन झाल्यावर कोल्हापूरात महालक्ष्मी दर्शन आणि किल्ले पन्हाळा दर्शन करता येईल.त्यानंतर रात्री आठ वाजता मुंबईकडे प्रयाण करणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या