मुंबई- मुंबईच्या नायगाव परिसरात एका दहावीच्या विद्यार्थ्याचा वीजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला. आकाश संतोष साहू (१५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो काल सायंकाळी ७ च्या सुमारास आपल्या मित्रांसोबत बीच कॉम्प्लेक्सच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता. यावेळी त्याचे शटलकॉक पहिल्या मजल्यावरील खिडकीत अडकले. ते काढण्यासाठी आकाश मित्राच्या मदतीने वर चढला असता, त्याला खिडकीच्या सज्जावर ठेवलेल्या एसीचा झटका लागल्याने
तो अचानक खाली कोसळला.
यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो एसीला चिकटल्याचे पाहून त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही विजेचा झटका बसला. सोसायटीतील रहिवाशांनी आकाशला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.