Home / महाराष्ट्र / Gold Rate : दागिन्यांसाठी अठरा कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी

Gold Rate : दागिन्यांसाठी अठरा कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी

Gold Rate : २४ कॅरेट सोन्याचा (24-carat gold)भाव आता १ लाख १० हजार रुपये प्रतितोळ्याच्या पार गेला आहे. सणासुदीनिमित्त दागिने...

By: Team Navakal
Gold Rate

Gold Rate : २४ कॅरेट सोन्याचा (24-carat gold)भाव आता १ लाख १० हजार रुपये प्रतितोळ्याच्या पार गेला आहे. सणासुदीनिमित्त दागिने बनवण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात सतत वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत सध्या दागिन्यांसाठी २४ कॅरेटऐवजी १८ कॅरेट सोन्याला (18-carat gold i) सर्वाधिक मागणी आहे.

१८ कॅरेट सोन्यात ७५ टक्के शुद्ध सोने आणि २५ टक्के (25% other metals)तांबे, चांदी आणि जस्त यांसारखे धातू मिसळले जातात. हे धातू मिसळल्याने सोन्याला अधिक मजबुती येते. ज्यामुळे दागिने टिकाऊ होतात. तर २४ कॅरेट सोने हे १०० टक्के शुद्ध असते. ते खूप मऊ असते. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनवणे कठीण जाते. म्हणूनच नाणी किंवा बिस्किटे यांसारख्या गुंतवणुकीसाठी २४ कॅरेट सोन्याचा प्रामुख्याने वापर होतो.

सोन्यामध्ये तांबे आणि अन्य धातू मिसळल्याने सोन्याचा रंग आणि पोतही बदलतो. तांबे मिसळल्याने (Mixing copper) सोन्याला लालसर छटा येते. ज्याला रोझ गोल्ड म्हणतात. चांदी (Silver) मिसळल्याने सोन्याचा पिवळसरपणा कमी होतो आणि त्याला अधिक चमक येते. १८ कॅरेट सोन्यापासून वेगवेगळ्या रंगछटांचे सोन्याचे दागिने (Jewellery)तयार करता येतात. त्यामुळे दागिन्यांसाठी आता १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी आहे.


हे देखील वाचा –

 चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू

खा.निकम सरकारी वकील कसे ? गँगस्टर विजय पालांडेचा आक्षेप

एलफिन्स्टन पूल पाडू देणार नाही ! स्थानिक रहिवाशांचा विरोध कायम

Web Title:
संबंधित बातम्या