Home / महाराष्ट्र / Aaditya Thackeray : मुंबईसाठी आदित्य ठाकरेंचा महा एल्गार; निवडणुकांच्या घोषणानंतर आदित्य ठाकरेंची मुंबईत पहिली सभा..

Aaditya Thackeray : मुंबईसाठी आदित्य ठाकरेंचा महा एल्गार; निवडणुकांच्या घोषणानंतर आदित्य ठाकरेंची मुंबईत पहिली सभा..

Aaditya Thackeray : राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज्यात राजकीय...

By: Team Navakal
Aaditya Thackeray
Social + WhatsApp CTA

Aaditya Thackeray : राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल देखील पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत; तर, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूनी देखील जोर लावला आहे. त्यासाठी ठाकरे बंधूंची युतीची घोषणा देखील लवकरच होणार आहे.

पुढील आठवडाभरात उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करायची असल्याने राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची, विविध मेळाव्यांची जबाबदारी आदित्य ठाकरे यांनी समर्थपणे उचलायचे दिसून येत आहे.

याच निवडणुकांच्या पार्शवभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी वरळीतील डोम या ठिकाणी सभा घेतली. या सभेत त्यांनीही अनेक महत्वपूर्ण मुद्यावर भाष्य केले. दुबार मतदार यादीवर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. शिवाय गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या कामाबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं आहे. त्यानंतर त्यांनी कोविड काळात मुंबईला कश्या पद्धतीने सांभाळले हे देखील सांगितले आहे. ते म्हणतात कोरोना सारख्या माहामारी सोबत लढणं कठीण होत. कोरोना काळात रुग्णाचे आकडे झपाट्याने वाढत होते त्याला कसा आळा घालायचा हे समजत न्हवत त्यानंतर आपण एक हॉस्पिटल उभारल्याची देखील माहिती त्यांनी दिली. पण या सगळ्याचे मोठे होर्डिंग लावत याचा बडेजाव न केल्याचे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षांना टोला देखील लावला.

पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील इतर बड्या नेत्यांचे कौतुक देखील केले आहे. पुढे ते म्हणतात ह्या सगळ्या लोकांमुळे मुंबईकरांच्या समोर पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण आजवर हा पल्ला गाठला. याशिवाय त्यानी एकनाथ शिंदेंना देखील लक्ष केलं. मागच्या २ अडीज वर्षात प्रचंड घोटाळे केल्याचा आरोप देखील त्यांनी केला. फक्त मोठे मोठे बॅनर्स लावण्यात आले. रस्त्याचे काम अजूनही राखडलेलेच दिसत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो कोस्टल रोडचा आराखडा मांडला तो आपलाच चोरला आहे. त्यांनी कोस्टल रोड, बीडीडी चाळ प्रकल्प यांच्या उद्घाटनात त्या कामांचे श्रेय घेतले. २०१४ मध्ये भाजपाच्या केंद्र सरकारने कोस्टल रोडची परवानगी रोखून धरली होती. त्यामुळे त्यांनी आमच्या कामांचे श्रेय घेऊ नये. असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.

आपल्या विजयावर भाष्य करताना पुढे ते म्हणतात हा विजय घरी बसून मिळणार नाही. आपण केलेल्या कामाची पोचपावती मुंबईकरांपर्यंत अभिमानाने पोचवा. महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारला. शिवसेनेने मुंबईत आरोग्याची काळजी घेतली. मुंबईकरांसाठी विविध सुविधा पुरवल्या. याशिवाय कोविडमध्ये महानगरपालिका २४ तास कार्यरत होत्या असे देखील ते म्हणाले. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंची हि सभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकारणाला कोणते नवीन वळण देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Fresh Lemons : जास्त काळ लिंबू न वापरल्याने ते खराब होते का? लिंबू जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी घरगुती उपाय..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या