Home / महाराष्ट्र / Aaditya Thackeray : ‘BCCI पैशांसाठी खेळत आहे का?’; भारत-पाक सामन्यावरून आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

Aaditya Thackeray : ‘BCCI पैशांसाठी खेळत आहे का?’; भारत-पाक सामन्यावरून आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

Aaditya Thackeray on India vs Pakistan Match: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट...

By: Team Navakal
Aaditya Thackeray on India vs Pakistan Match

Aaditya Thackeray on India vs Pakistan Match: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामन्यावरून देशात जोरदार वाद सुरू झाला आहे. या सामन्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून आदित्य ठाकरे यांनी थे BCCI, खेळाडू आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बीसीसीआय देशभक्तीपेक्षा पैशाला प्राधान्य देत आहे का?

आदित्य ठाकरे यांनी सामन्याला विरोध करताना अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्या पाकिस्तानने दहशतवाद पसरवला आणि पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर हल्ला केला, त्याच देशासोबत खेळण्यासाठी BCCI एवढी उत्सुक का आहे, असा सवाल त्यांनी विचारला. हा निर्णय केवळ पैशांसाठी, जाहिरातींच्या फायद्यासाठी किंवा खेळाडूंच्या मानधनासाठी घेतला गेला आहे का, अशी टीकाही त्यांनी केली.

पाकिस्तानने जेव्हा भारतात झालेल्या हॉकी आशिया चषक स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता, तर मग भारतीय क्रिकेटपटूंना तिथे जाऊन खेळण्याची काय गरज आहे, असे त्यांनी विचारले. BCCI देशविरोधी वागत आहे आणि स्वार्थी बनत आहे. म्हणूनच ब्रॉडकास्टर्सनी सुद्धा या सामन्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार आणि खेळाडूंच्या देशभक्तीवर प्रश्न

आदित्य ठाकरेंनी यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना देखील लक्ष्य केले. “क्रिकेटपटूंनी बहिष्कार घालावा, ते खेळाडू राष्ट्रभक्त आहेत. जे खेळणार आहेत, त्यांनी त्यांच्यातील देशभक्ती किती जागृत आहे याचा विचार करावा,” असे ते म्हणाले.

“जर पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, तर मग क्रिकेट आणि रक्त एकत्र चालू शकतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. एका बाजूला आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता ठरवायचे आणि निवडणुकीच्या प्रचारात लष्कराच्या कारवाईचा बडेजाव करायचा आणि दुसऱ्या बाजूला BCCI ला पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी सरकार गप्प का बसले आहे, असे ते म्हणाले.

भाजपने आपली मूळ विचारधारा बदलली असल्याचा आरोपही त्यांनी केला. “खरी भाजपा सत्तेत असती, तर हे झालं नसतं.

हे देखील वाचा – सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; Gen Z ने Discord वरून केली निवड; हा प्लॅटफॉर्म नक्की काय आहे?

Web Title:
संबंधित बातम्या