मुंबई – मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra state cabinet)पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री या बैठकीस उपस्थित होते. यावेळी ३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन (abhijat marathi bhasha din)म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
यासंदर्भात बोलताना दीपक केसरकर (deepak kesarkar)म्हणाले की, मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला दर्जा मिळावा यासाठी राज्याने दशकभर प्रयत्न केले. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी भाषा समितीने महत्त्वाचे काम केले. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालय , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला आहे. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरत आले आहे. ३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
