मुंबई – नाशिक आणि रायगडच्या (Nashik and Raigad)पालकमंत्रिपदावरून महायुतीत(Mahayuti alliance )निर्माण झालेला तिढा वाद अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी कोण ध्वजारोहण करणार, असा प्रश्न गेले काही दिवस विचारला जात होता. आज राज्य सरकारने परिपत्रक काढून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्यात मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) ध्वजारोहण करतील असे जाहीर केले आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर (guardian minister)शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogawale)आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी हक्क सांगत आहेत. नुकतीच दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांच्यात बैठक झाली. मात्र तटकरे यांनी हक्क सोडण्यास नकार दिल्याचे कळते. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण सरकारच्या निर्णयामुळे गोगावले यांना धक्का बसला आहे.
नाशिकमध्ये भाजपाचे (BJP) गिरीश महाजन आणि शिंदे सेनेचे दादा भुसे (Shinde Sena’s Dada Bhuse)यांच्यात पालकमंत्रिपदासाठी चुरस आहे. दुसरीकडे कुंभमेळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन पालकमंत्रिपद सोडण्यास भाजपाने नकार दिला आहे. तर दादा भुसे यांनीही पालकमंत्रिपदाची मागणी लावून धरली आहे. मात्र, आता ध्वजारोहणाचा (flag-hoisting)मान गिरीश महाजन यांना दिल्याने दादा भुसे यांचा अपेक्षाभंग आहे.