वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश वेळापत्रक जाहीर ! ३० जुलैपर्यंत नोंदणी

MHT-CET has announced the admission schedule

मुंबई – एमएचटी- सीईटी (MHT-CET))अर्थात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.त्यानुसार एमबीबीएस (MBBS),बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस (BUMS)या अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी २३ जुलैपासून सुरू झाली असून ती ३० जुलैपर्यंत करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल.

यंदा नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर झाला होता.त्यानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने अखिल भारतीय कोट्याचे (Medical Counselling Committee)वेळापत्रक जाहीर केले.तसेच राज्य कोट्याची प्रवेश प्रक्रिया राबविण्यांसदर्भातही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस,बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी (MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS, BPTH, BOTH, BASLP) या अभ्यासक्रमासाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

त्याचप्रमाणे ३१ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना शुल्क भरून त्यांची नोंदणी निश्चित करायची आहे.तसेच १ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या रंगीत प्रती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी मुदत दिली आहे.नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर केली. त्यातील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची अंतरिम यादी (merit list)आणि जागांचा तपशील २ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीसाठी ३ ते ५ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर ७ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.