धारावीपाठोपाठ मोतीलाल नगरचापुनर्विकासही आता अदानी करणार ! म्हाडासोबत केला करार ! ६०० चौरस फुटांचे घर

motilal nagar redevelopment by adani

मुंबई – धारावी (Dharavi) पाठोपाठ आता गोरेगाव पश्चिमेला असलेल्या मोतीलाल नगर १,२ व ३ या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकासही (redevelopment) अदानी समूह करणार आहे. त्यासाठी म्हाडा आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणुन नियुक्त केलेला अदानी समुह यांच्यात काल करार करण्यात आला.

म्हाडा (MHADA) चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, अदानी प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेडचे (Adani Group) संचालक प्रणव अदानी यांच्या उपस्थित म्हाडा मुख्यालयात हा कराराचा कार्यक्रम पार पडला.यावेळी जयस्वाल यांनी सांगितले की, मोतीलाल नगरच्या (Motilal Nagar)रहिवाशांनी जे स्वप्न अनेक वर्षे उराशी बाळगले. त्याची रुपरेषा आता प्रत्यक्षात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित व सुसज्ज घरे प्रदान केली जाणार आहेत. तब्बल १४२ एकर जागेत ही मोतीलाल नगर १,२,३ म्हाडा वसाहत (1, 2, and 3 colonies) आहे. कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट पद्धतीने राबविण्यात येणारा देशातील पुनर्विकासाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘म्हाडा’तर्फे येथील रहिवाशांना १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेमध्ये मोफत पुनर्वसन होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला ३ लाख ९७ हजार १०० चौरस मीटर क्षेत्र विकासकाकडून बांधून मिळणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता देऊन म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे हा प्रकल्प राबविण्याचे शासन निर्णयाद्वारे निर्देशित केले. या वसाहतीत ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन साधारणपणे ०५ लाख ८४ हजार १०० चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अनिवासी गाळेधारकांना ९८७ चौरस मीटर चौरस फुटांचे व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असून १५ मिनिटांचे शहर या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेद्वारे या प्रकल्पातील घरांपासून कार्यालय, सार्वजनिक परिवहन सेवा,मेट्रो स्टेशन, उद्यान, मनोरंजन ठिकाण, शाळा, हॉस्पिटल १५ मिनिटांच्या अंतरावर असणार आहे. पाच एकरचे मध्यवर्ती उद्यान हे या प्रकल्पातील (project)वैशिष्ट्य आहे.