कृषिमंत्री कोकाटेंना जाब विचारणार ! अजित पवारांचे कारवाईचे संकेत

Ajit Pawar

मुंबई – विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्या प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Maanikrao Kokate)अडचणीत आले असून या प्रकरणात कडक कारवाईचे (strict action) संकेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी दिले आहेत. इजा झाली, बिजा झाली, आता तिजा होऊ देऊ नका अशी मी पूर्वीच त्यांना तंबी दिली होती. कोकाटेंसोबत सोमवारी चर्चा करून जाब विचारणार (explanation) आहे आणि योग्य तो निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, मला कृषीमंत्र्यांच्या त्या व्हिडीओबद्दल जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या (assembly hall) आत घडलेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar)आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपण तसे काहीही खेळत नसल्याचा दावा केला. माणिकराव कोकाटे यांच्यासोबत अजून माझी भेट झाली नाही. सोमवारी आम्ही भेटण्याची शक्यता आहे. सोमवारी भेटल्यानंतर त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे . चर्चा केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईन. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. मी यापूर्वीही कोकाटेंना तंबी दिली होती. तेव्हाही इजा झाली, बिजा झाली, तिजा होऊ देऊ नका अशी जाणीव करून दिली होती.सरकारला भिकारी का म्हणाले? या विधानाबाबतही कोकाटेंना जाब विचारणार आहे.कृषिमंत्री असो किंवा इतर कोणताही मंत्री असो लोकांपुढे बोलताना तारतम्य ठेवूनच बोलले पाहिजे.