Home / महाराष्ट्र / Ambernath Crime News : अंबरनाथमध्ये गोळीबाराचा थरार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री फायरिंग; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ambernath Crime News : अंबरनाथमध्ये गोळीबाराचा थरार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री फायरिंग; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ambernath Crime News : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. आता अशातच अंबरनाथमधील (Ambernath Crime News)...

By: Team Navakal
Ambernath Crime News
Social + WhatsApp CTA

Ambernath Crime News : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. आता अशातच अंबरनाथमधील (Ambernath Crime News) भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे. भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे. (Ambernath Crime News)

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील एयरनीवर आल्याचे दिसून येत आहे. ही घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पवन वाळेकर असं या भारतीय जनता पार्टीचे उमेदवाराचे नाव आहे.

Ambernath Crime News: नेमकं प्रकरण काय?
दुचाकीवरून दोन अज्ञात इसम मध्यरात्री आले आणि त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून अचानक कार्यालयाच्या दिशेने ३-४ राऊंड झपाट्यबे फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले, आणि या हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. या गोळीबारात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. तसेच या गोळीबारात कोणत्याहीप्रकारची जीवितहानी झाली नाही. भरवस्तीत अशा प्रकारे गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यासंदर्भातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार वायर होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा, या मागणीवर त्यांनी जोर धरून ठेवला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत; तसेच उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे.

झालेल्या गोळीबारात अज्ञात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांचे नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन देखील केले, तर आज संध्याकाळी अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील होणार आहे.


हे देखील वाचा – Municipal Corporation Election: तुम्हाला नगरसेवक व्हायचंय? मग जाणून घ्या काय आहे पात्रता, अपात्रतेचे नियम आणि आवश्यक कागदपत्रे!

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या