Home / महाराष्ट्र / आयफोन 17 च्या लाँचपूर्वी Apple चा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरात उघडणार नवे स्टोअर

आयफोन 17 च्या लाँचपूर्वी Apple चा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरात उघडणार नवे स्टोअर

Apple Store in Pune

Apple Store in Pune: जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Apple भारतात आपल्या रिटेल स्टोअर्सचा विस्तार करत आहे. नुकतीच त्यांनी भारतातील त्यांच्या चौथ्या रिटेल स्टोअरची घोषणा केली आहे. हे नवीन स्टोअर पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये 4 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने बंगळूरूमध्ये तिसऱ्या स्टोअरची घोषणा केली होती. Apple च्या पुण्यातील स्टोअरची घोषणा आगामी आयफोन 17 सीरिजच्या लाँचपूर्वी झाली आहे.

Apple Store in Pune: खास डिझाइन आणि सुविधा

पुण्यातील या नवीन स्टोअरचे नाव ‘Apple Koregaon Park’ असे ठेवण्यात आले आहे. या स्टोअरची डिझाइन देखील बंगळूरूच्या ‘Apple Hebbal’ स्टोअरसारखीच आहे, ज्यात भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या पिसांपासून प्रेरणा घेतलेले आकर्षक कलाकृती तयार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे स्टोअर सुमारे 10,000 स्क्वेअर फूट जागेत असेल, जे Apple च्या मुंबईतील ‘Apple BKC’ स्टोअरनंतर भारतातील सर्वात मोठे स्टोअर ठरू शकते.

ग्राहकांना मिळणार विशेष अनुभव

नवीन स्टोअरमध्ये ग्राहक iPhone, Mac, Apple Watch, iPad आणि इतर सर्व Apple उत्पादनांचा अनुभव घेऊ शकतील. स्टोअरमधील तज्ज्ञ टीम ‘स्पेशलिस्ट्स’, ‘क्रिएटिव्हज’ आणि ‘जीनियस’ नावाने ओळखली जाईल, जी ग्राहकांना उत्पादनांची माहिती देईल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देईल.

यासोबतच, Apple ‘Today at Apple’ या कार्यक्रमाचे आयोजन करेल, ज्यात ग्राहकांना फोटोग्राफी, संगीत आणि कोडिंगसारख्या विषयांवर मोफत वर्कशॉपमध्ये सहभागी होता येईल.

याआधी Apple ने एप्रिल 2023 मध्ये मुंबईत पहिले स्टोअर उघडले होते, त्यानंतर दिल्लीतील दुसरे स्टोअर लवकरच सुरू झाले. आता पुणे आणि बंगळूरूमधील स्टोअर्ससह Apple ने भारतात आपला विस्तार अधिक वेगाने सुरू ठेवला आहे.


 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा-

महादेवी हत्ती प्रकरणानंतर ‘वनतारा’च्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा