Atal Setu EV Toll Free: महाराष्ट्र सरकारच्या शाश्वत वाहतूक धोरणाला बळ देण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता अटल सेतू (Atal Setu EV Toll Free) वरून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत एप्रिल महिन्यात ही घोषणा करण्यात आली होती, ज्याची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या निर्णयाचा उद्देश कार्बन उत्सर्ज कमी करणे, प्रदूषण नियंत्रित करणे आणि स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा आहे. लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावरही इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी लागू करण्यात येणार आहे.
आता अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना टोलमाफी लागू असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना 50% टोल सवलत मिळणार आहे.
खाजगी इलेक्ट्रिक कार, प्रवासी चारचाकी वाहने, राज्य परिवहन बसेस आणि शहरी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचा यात समावेश आहे. मात्र, इलेक्ट्रिक मालवाहू वाहनांना ही सूट लागू नाही.
दरम्यान, मुंबईमध्ये सध्या 22,400 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत आहेत. यामध्ये 18,400 हलकी चारचाकी वाहने आणि 4,000 पेक्षा जास्त प्रवासी वाहने आहेत. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल अशी अधिकाऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा –
भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक
जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त