Beed Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule–Solapur Highway) बीडजवळील नामलगाव फाटा येथे आज सकाळी आठच्या सुमारास देवदर्शनासाठी पायी जाणाऱ्या ६ भविकांना कंटेनरने चिरडले(Accident) . या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला . तर दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले होते. पण उपचारांदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
मयत तरुण हे पेंडगाव येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ कंटेनरने त्या तरुणांना उडवले. अपघातानंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. आकाश अर्जुन कोसळे (२५ ), दिनेश दिलीप पवार, विशाल श्रीकृष्ण काकडे (२५), किशोर गुलाब तावरे (२०), अनिकेत रोहिदास शिंदे (२५ ) आणि पवन शिवाजी जगताप (२५) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या कंटेनर अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगावर आळा घालावा, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
कोस्टल रोड सुशोभिकरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची निवड
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील बळींच्या कुटुंबियांना आरसीबीकडून २५ लाखांची मदत