Beed Jail – बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड (Jail Superintendent Petrus Gaikwad)वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारागृहातील शिक्षा भोगत असलेला कैदी सचिन कृष्णार्थ कदम (Sachin Krishnarth Kadam)याच्याकडून अधीक्षकांची खासगी गाडी (private car) धुण्याचा प्रकार उघड झाला असून, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सचिन कदम हा एका गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेला असून, तो गेली दहा वर्षे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र त्याला नियमानुसार कारागृहात ठेवण्याऐवजी अधीक्षकांकडून त्याच्याकडून खासगी गाडी धुणे, बूट पॉलिश करणे, भांडी घासणे व कपडे धुणे अशी वैयक्तिक कामे करवून घेतली जात असल्याचा आरोप होत आहे. व्हिडिओमध्ये तो कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार करत असल्याचेही दिसून येत आहे.
आरटीओ (RTO) विभागाच्या माहितीनुसार, या व्हिडिओत दिसणारी गाडी ही अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या मालकीचीच आहे. आश्चर्य म्हणजे या गाडीचा विमा २०२१ मध्येच संपला असूनदेखील ती गाडी अद्याप रस्त्यावर धावत असल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कारागृह परिसरातील मोठ्या झाडांची कत्तल केल्यानेच अधीक्षक गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून (Deputy Inspector General)आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर आता कैद्याकडून खासगी गाडी धुण्याचा प्रकार समोर आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा –
‘अनेकांना वाटलं माझी राख होतेय, पण…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
Asia Cup 2025 स्पर्धेचे बिगुल वाजले! कधी व कुठे पाहाल भारताचे सामने? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स; Samsung आणि Redmi वर मोठी सूट