Home / महाराष्ट्र / Vaibhav Khedekar : भाजपा प्रवेशासाठी गाडी सजलीपण खेडेकरांचा प्रवेश लटकला!

Vaibhav Khedekar : भाजपा प्रवेशासाठी गाडी सजलीपण खेडेकरांचा प्रवेश लटकला!

Vaibhav Khedekar

Vaibhav Khedekar : मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले कोकणातील महत्त्वाचे नेते (Konkan leader)वैभव खेडेकर यांचा भाजपा (BJP) प्रवेश लांबणीवर पडला आहे. पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी म्हणून खेडेकर यांचे स्टीकर लावून चारचाकी वाहने सजवण्यात आली आहेत.

मनसेतून (MNS)हकालपट्टी केल्यानंतर भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन खेडेकर ४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मुंबईत आज त्यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार होता. मात्र हा प्रवेश सोहळा ऐनवेळी स्थगित करण्यात आला. याबाबत खेडेकर यांनी सांगितले, की राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC reservation)मुद्द्यामुळे वातावरण संवेदनशील आहे. यामुळेच भाजपा प्रवेशाची तारीख पुढे ढकलली आहे. आम्ही योग्य वेळेची प्रतीक्षा करत आहोत. प्रवेशाची नवी तारीख लवकरच जाहीर होईल.

दरम्यान, कोकणात खेडेकर यांचा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात साजरा होणार होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी केलेली खास वाहन सजावट चर्चेचा विषय ठरली. या वाहनावर कोकणचा ढाण्या वाघ माननीय वैभव खेडेकर यांचा जाहीर प्रवेश असे लिहिले आहे. त्यावर खेडेकर यांचा फेटा घातलेला फोटो आणि भाजपाचे पक्षचिन्ह (BJP’s party symbol.)ठळकपणे झळकत होते.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

शेअर बाजारात माफक तेजीजी ; एसटी निर्णयांचा परिणाम

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन नवीन धरणांचा प्रस्ताव

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना देणार 2500 रुपये