Home / महाराष्ट्र / विकास, व्होट जिहाद आणि भ्रष्टाचाराचा त्रिसुत्री अजेंडा! भाजपाचा मुंबई जिंकण्याचा संकल्प पूर्ण होणार?

विकास, व्होट जिहाद आणि भ्रष्टाचाराचा त्रिसुत्री अजेंडा! भाजपाचा मुंबई जिंकण्याचा संकल्प पूर्ण होणार?

BJP BMC Election: भारतीय जनता पार्टीचा मुंबई मनपासाठी विजय संकल्प मेळावा मंगळवारी मुंबईत संपन्न झाला. वरळी डोम पूर्ण भरला होता....

By: Team Navakal
BJP BMC Election

BJP BMC Election: भारतीय जनता पार्टीचा मुंबई मनपासाठी विजय संकल्प मेळावा मंगळवारी मुंबईत संपन्न झाला. वरळी डोम पूर्ण भरला होता. उत्साह होता. ऊर्जा होती. त्यात उत्तेजना निर्माण करणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांची भाषणं होती. जागा तीच जिथं मराठी विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. मराठीत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंची भाषिक युती झाली. त्याच जागी आपला विजय संकल्प करण्यामागे भाजपाची रणनीती स्पष्ट आहे.

मराठी – अमराठी सर्व मुंबईकरांना घट्ट धरून ठेवायचंच आणि मुख्य लढाई ठाकरेंशीच हे जाणत त्यांच्यावर भ्रष्टाचार, मुसलमान अनुनयाचे टोकाचे आरोप करत ब्रँडला धक्का पोहचवायचा. त्याचवेळी विकास मांडत विजयी समीकरण जुळवण्याची रणनीती दिसली.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी माजी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री आशिष शेलारांची आक्रमक परंपरा आणखी पुढे नेली. आणखी धार देत ते तुटून पडले ते ठाकरेंवरच. विधानसभा निवडणुकीत चाललेला व्होटजिहाद मुद्दा आता मुंबई मनपातही भाजपाच्या प्रचार अजेंड्यावर असणार हे अमित साटमांच्या भाषणातून दिसून आले. त्यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांचा उल्लेख केला, तो इथे महत्वाचा. “तुम्हाला मुंबईतल्या सर्व प्रभागांमध्ये वर्सोवा होऊ द्यायचा आहे का? तुम्हाला मुंबईतील सर्व रस्त्यांचा मोहम्मद अली रोड होऊ द्यायचा आहे का,” असं त्यांनी विचारणं हे व्होटजिहाद शब्द उच्चारला नसला तरी मुंबईकरांच्या मनात तेच बिंबवायचे असल्याचे स्पष्ट संकेत देणारे आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात ठाकरे ब्रँडवर केलेला हल्लाबोल मुख्य शत्रू ठाकरेंची शिवसेनाच हे स्पष्ट करणारा. तसंच “महायुतीचा भगवा फडकणार” हे त्यांनी सांगणे महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार याचेही संकेत देणारे. त्याचवेळी मेट्रो ते कोस्टलरोड विकास कार्याची मांडणी करत मुंबईला आपणच तंत्रज्ञानाधारीत अर्थकारणात आघाडीवर ठेवण्याची त्यांची घोषणा विकासाचे पैलू वाढवणारी. त्याचवेळी ठाकरेंना थेट कफनचोर संबोधत, भ्रष्टाचाराचे आरोप करत ठाकरे ब्रँडला धक्का देण्याचा प्रयत्नही दिसला.

सर्वोच्च न्यायालयानं ३१ जानेवारीपूर्वी निवडणुकांचे आदेश दिले, त्याच दिवशी करण्यात आलेला हा संकल्प विजयाच्या लक्ष्यापर्यंत प्रत्यक्षात येतो की नाही ते पुढील राजकारणावर अवलंबून असेल. महायुतींर्गत जागावाटप राजकारण आणि ठाकरे युती होते की होत नाही, ठाकरी युती झाली तरी मग ती मविआसहच की वेगळी? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपाविरोधक कशापद्दधतीने लढतात, त्यावरही अवलंबून असेल. त्यामुळे भाजपाचा संकल्प मजबूतीनं झाला असला तरी निकालाबद्दल आताच हमखास असंच घडेल असं सांगणे अवघडच!

हे देखील वाचा – अतिवृष्टीने महाराष्ट्रातील 17 लाख हेक्टर शेती बाधित, पंचनामे सुरू; सरकारकडून मदतीची घोषणा

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या