Siddhivinayak Temple : दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या (Siddhivinayak Temple) विस्तारासाठीचा प्रकल्प आता मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत. भाविकांसाठी अधिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मंदिर ट्रस्ट (Temple Trust) ने शेजारच्या एका निवासी इमारती (Residential Building) च्या संपादनाची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च येणार आहे.
या प्रकल्पात दर्शन रांगेचा नेटकेपणा राखण्यासोबतच नवीन हॉल, प्रसादालय, भाविकांसाठी स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम आणि इतर आवश्यक सुविधांचा समावेश असणार आहे. शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा मंदिरा (Sai Baba Temple) च्या धर्तीवर या सुविधा दिल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या (BMC) सहकार्याने सुमारे ४५० चारचाकींसाठी भूमिगत पार्किंगही देण्यात येणार आहे.
मंदिर ट्रस्टकडून सध्या राम मॅन्शन (Ram Mansion) नावाच्या तीन मजली इमारतीचे संपादन केले आहे. मंदिराशेजारच्या भिंतीला लागूनच सुमारे १,८०० चौरस मीटर क्षेत्रफळावर ही इमारत आहे. ट्रस्टने अलीकडेच जाहीर नोटीस देऊन राम मॅन्शन कोणत्याही अटीशर्थींशिवाय ताब्यात घेत असल्याचे सांगितले. रहिवाशांना बाजारभावाच्या वर मोबदला देण्यात येणार आहे. ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांनी सांगितले की ही प्रक्रिया १५ वर्षांपूर्वी सुरू केली होती. नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडत असल्याने वेळ लागला. आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. सध्या आराखडे तयार आहेत, मात्र अंतिम आराखडा अद्याप निश्चित व्हायचा आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मिठी नदी प्रकल्पाच्या खर्चात चौथ्यांदा कपात