Home / महाराष्ट्र / ‘कॅडबरी’चा अनोखा उपक्रम, चॉकलेट खाताना मराठीही शिकता येणार; रॅपरवर छापले ‘हे’ खास शब्द

‘कॅडबरी’चा अनोखा उपक्रम, चॉकलेट खाताना मराठीही शिकता येणार; रॅपरवर छापले ‘हे’ खास शब्द

Cadbury Dairy Milk Marathi Word

Cadbury Dairy Milk Marathi Word: गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरून वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात मराठीतच संवाद साधायला हवा, अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅडबरी डेअरी मिल्कने खास उपक्रम सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

या प्रसिद्ध चॉकलेट कंपनीने आपल्या पॅकेजिंगमध्ये एक खास बदल केला आहे, ज्यामुळे आता मराठी भाषा थेट चॉकलेटच्या रॅपरवर दिसत आहे. ‘जरा जरा मराठी…’ या घोषणेसह कॅडबरीने इंग्रजी आणि मराठीतील काही सोपी वाक्ये छापली आहेत. यामुळे सोशल मीडियावरया उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे, आणि अनेकांनी याला महाराष्ट्रातील मराठीच्या भूमिकेशी जोडले आहे.

रॅपरवर काय लिहिले आहे?

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये (Viral photo) कॅडबरीच्या रॅपरवर इंग्रजी आणि मराठीतील काही संवाद छापले आहेत, जसे की: ‘जरा जरा मराठी…’, ‘थँक यू – धन्यवाद’, ‘व्हॉट?-काय’, ‘हाऊ आर यू?-कसे आहात?’, ‘सॉरी – माफ करा’, ‘नीड हेल्प – मदत हवी का?’, लिटल – जरा’, ‘इव्हिनिंग – संध्याकाळ’, असे शब्द रॅपरवर छापले आहेत.

डेअरी मिल्कच्या या रॅपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यासाठी कंपनीचे कौतुक करत आहेत. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळानेही (Brihanmaharashtra Marathi Mandal) कॅडबरी डेअरी मिल्कच्या या उपक्रमाचे आभार मानले आहेत.