बुलडाणा- मनसेचे (MNS) बुलडाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव याने मेहकर येथील एका खाजगी रुग्णालयात (Private hospital) ज्युनियर डॉक्टरला (Junior Doctor) मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ (Video) समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. संबंधित डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस (Police) ठाण्यात जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गाभणे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. लक्ष्मण जाधव आपल्या मित्रांसह आयसीयू विभागात उपचार घेत असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मात्र तेथील डॉक्टरने नियमांचे पालन करत रुग्णाला भेटण्यासाठी एकाच वेळी अनेक लोकांना आयसीयूमध्ये प्रवेश देता येणार नाही असे स्पष्ट केले. या सूचनेनंतरही लक्ष्मण जाधव आक्रमक झाले आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र आत जाऊ द्या असे म्हणत तिथे कार्यरत एका ज्युनिअर डॉक्टरला मारहाण केली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली . रुग्णालयातील सुरक्षा आणि डॉक्टरांवरील हल्ल्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.