Ganpati Special Trains- गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ४४ अतिरिक्त विशेष गाड्या !

Ganpati Special Trains

मुंबई – गणपती- गौरी सणानिमित्त (Ganesh and Gauri festivals,)कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष २५० गणपती ट्रेनव्यतिरिक्त आणखी ४४ विशेष ट्रेन चालवणार (44 additional special trains)आहे. दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी २ सेवा चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात २९६ विशेष ट्रेन गणेशभक्तांच्या सेवेत धावणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड (Sawantwadi Road)-लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेनच्या एपूण ८ सेवा चालविण्यात येणार आहेत. ही ट्रेन २८ ऑगस्ट,३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.या गाडीच्या ४ सेवा चालविण्यात येतील.ही गाडी परतीच्या प्रवासात २८ ऑगस्ट,३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथून रात्री ११.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचणाऱ्या या गाडीचे आरक्षण ३ ऑगस्टपासून होईल.

दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या २ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. दिवा-चिपळूण (Diva–Chiplun–Diva M)विशेष ट्रेनची १ फेरी आणि चिपळूण-दिवा विशेष ट्रेनची १ फेरी वाढवली आहे.यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता ४० अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान चालवण्यात येईल. दिवा-खेड(Diva–Khed train)-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाडय़ांच्या ३६ सेवा चालविण्यात येतील. ही मेमू विशेष ट्रेन २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ८ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष ट्रेन २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत खेड येथून दररोज सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिवा येथे पोहचेल.