मुंबई – वरळी येथील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन (Acharya Atre Chowk Metro)येथे २६ मे २०२५ रोजी पावसामुळे पाणी शिरल्याची (rainwater entered the station)गंभीर घटना घडली. या घटनेमुळे मेट्रो स्टेशनवरील प्रवासी सेवा तात्काळ थांबवावी लागली. याप्रकरणी निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्याने कंत्राटदार कंपनी डोगस-सोमा यांच्यावर दहा लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविल्यानंतर प्राप्त झाली.
कंत्राटदार कंपनी डोगस-सोमा (Dogus-Soma)यांस पाठविलेल्या नोटीस अनुसार २६ मे २०२५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसात आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनच्या कॉन्कोर्स लेव्हलमध्ये पाणी शिरले. ही घटना मुख्यत्वे बी २ एंट्री/एक्झिट इंटरफेसवर(B2 entry/exit interface)बसवलेल्या तात्पुरत्या फायर बॅरियर सिमेंट प्रीकास्ट पॅनेल वॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे घडली. बॅरियर फुटल्यामुळे पावसाचे पाणी आणि कचरा स्टेशन बॉक्समध्ये प्रवेशला, ज्यामुळे चिखल साचला आणि पाण्याचा प्रवाह प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स, अंडर क्रॉफ्ट लेव्हल, एएफसी सिस्टम, सिग्नलिंग, टेलिकॉम, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कंट्रोल रूम पर्यंत पोहोचला. या पाण्यामुळे स्टेशनवरील आर्किटेक्चरल डिझाइन/सजावटीचे नुकसान झाले आणि प्रवासी सुविधांवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे तात्काळ सेवा बंद करावी लागली. विशेष म्हणजे मेट्रो 3 च्या एकाही अधिकार्यावर कारवाई करण्यात आली नाही.