व्हेज नाॅनव्हेज स्वतंत्र शिजवा अन्न प्रशासनाचा रेस्टाॅरंटना आदेश

egetarian and non-vegetarian food items

मुंबई – शाकाहारी (vegetarian)आणि मांसाहारी (non-vegetarian)अन्नपदार्थांची साठवणूक व प्रक्रिया स्वतंत्रपणे करणे बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार (Food Safety Act)याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपाहारगृहांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त (Food and Drug Administration) राजेश नार्वेकर यांनी दिला आहे.

राज्यभरातील अन्न आस्थापनांमध्ये अन्न साठवण आणि स्वयंपाक प्रक्रिया एकत्रित केल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कारवाई सुरु केली आहे. नार्वेकर म्हणाले की, अन्न शिजवणे व साठवणीच्या टप्प्यावर शाकाहारी व मांसाहारी अन्नासाठी स्पष्टपणे स्वतंत्र व्यवस्था असावी. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांचा परवाना रद्द करणे, दंड आकारणे अशी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात आहेत. अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ती ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमभंग करणाऱ्या अन्न व्यावसायिकांना त्वरित नोटीस देऊन कडक कारवाई केली जात आहे.