Devendra Fadnavis on Meenatai Thackeray statue incident: मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या निंदनीय घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून टीका केली आहे. आता या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. “अशा प्रकारची घटना निषेधार्ह आहे. ज्या कोणत्या समाजकंटकाने हे कृत्य केले असेल त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. या घटनेला राजकीय रंग देणे योग्य वाटत नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
Pune | On the reported incident of paint thrown on the statue of Meenatai Thackeray, wife of Shiv Sena founder Bal Thackeray, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "Such an incident is completely condemned. Whoever has done this, the police will track them down and take action.… pic.twitter.com/eQBrHD24Bq
— ANI (@ANI) September 17, 2025
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. “हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ज्याला स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा ‘लावारिस’ व्यक्तीने हे कृत्य केले असावे. बिहारमध्ये ज्याप्रकारे पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान झाल्याचे सांगून राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला, तसाच हा महाराष्ट्रात आग लावण्याचा उद्योग असू शकतो,” असा आरोप त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी भेट दिली. राज ठाकरे यांनी स्वतः पुतळ्याची पाहणी करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातळने बंदोबस्त वाढवला . फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी येऊन फेकलेल्या रंगाचे 5 नमुने गोळा केले आहेत. या नमुन्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे देखील वाचा – ‘तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद