Home / महाराष्ट्र / Dhananjay Munde : धनंजय मुंडे अमित शाहांच्या भेटीला; कोकाटेंच्या जागी संधी मिळणार?

Dhananjay Munde : धनंजय मुंडे अमित शाहांच्या भेटीला; कोकाटेंच्या जागी संधी मिळणार?

Dhananjay Munde : सदनिका घोटाळाप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी...

By: Team Navakal
Dhananjay Munde
Social + WhatsApp CTA

Dhananjay Munde : सदनिका घोटाळाप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले होते; परंतु त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

नाशिक उच्च न्यायालयाने काल माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे देखील दिसत होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून केली जात आहे. अशातच माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार कि काय अश्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. जवळपास एक तास धनंजय मुंडे हे संसद भवनात असल्याची माहिती होती. ११ वाजता ते संसद भवनात आले होते. आणि त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात घर वापसी होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील दिल्लीत आहेत. यांमुळे धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे.


हे देखील वाचा – Severe Cold : हिवाळ्यात हे उबदार घरगुती पदार्थ खा..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या