Home / महाराष्ट्र / भिवंडी शहरात खड्ड्यामुळे दुचाकीस्वार डाॅक्टरचा मृत्यू

भिवंडी शहरात खड्ड्यामुळे दुचाकीस्वार डाॅक्टरचा मृत्यू

Doctor Dies in accident

मुंबई – भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात खड्ड्यामुळे दुचाकी (motorcycle) घसरून मोहम्मद नशीम अन्सारी (Dr. Mohammad Nasim Ansari) (५८) या डॉक्टरचा मृत्यू झाला.

वंजारपट्टी नाका येथील ढाब्यावर जेवण करून अन्सारी दुचाकीवरून घरी जात होते. राज हॉस्पिटलसमोरील (Raj Hospital,) रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरखाली (truck) ते चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, वंजारपट्टी नाका येथील एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर (APJ Abdul Kalam Flyover)खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूक खालून वळवण्यात आली होती.

याचदरम्यान ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन (protest)केले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी भिवंडीत रस्त्यांमुळे आतापर्यंत तिघांचा बळी गेला, याला जबाबदार (responsibility)कोण? असा सवाल उपस्थित केला.