Mumbai ED Office Fire :  मुंबईत ईडीचे कार्यालय असलेल्या इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Mumbai ED Office Fire

Mumbai ED Office Fire | दक्षिण मुंबईतील ‘बलार्ड इस्टेट’ परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate – ED) कार्यालय असलेल्या इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी मध्यरात्री 2 वाजून 32 मिनिटांनी करीमभॉय रोडवरील (Currimbhoy Road) ग्रँड हॉटेलजवळ असलेल्या बहुमजली इमारत ‘कैसर-ए-हिंद’ मध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला (Fire brigade) मिळाली. याच इमारतीत अंमलबजावणी संचालनालयाचे कार्यालय आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने ग्रँड हॉटेलजवळील घटनास्थळी पोहोचल्या. सुमारे 3 वाजून 30 मिनिटांनी आगीची तीव्रता स्तर-२ पर्यंत वाढली आणि नंतर 4 वाजून 21मिनिटांनी ती स्तर-३ पर्यंत वाढली, ज्यामुळे ही एक मोठी आग दुर्घटना ठरली.

आगीला स्तर-3 ची श्रेणी घोषित करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने सांगितले की, सुमारे साडेतीन वाजता आग ‘स्तर-2’ पर्यंत वाढली, ज्याला साधारणपणे भीषण आग मानले जाते.

एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित राहिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आठ अग्निशमन गाड्या, सहा टँकर, एक बचाव व्हॅन, एक त्वरित प्रतिसाद वाहन आणि एक रुग्णवाहिका यासह इतर मदत सामग्री घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.