छांगूर बाबा प्रकरणात मुंबईत ईडीचे छापे

ED raids in Mumbai in Chhangur Baba case

मुंबई – उत्तर प्रदेशातील (UP) कथित धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार छांगूर बाबा (chhangur baba) ऊर्फ जलालुद्दीन यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. छांगूर बाबाच्या लपण्याच्या ठिकाणांसह त्याच्या सहकार्यांवर आज ईडीच्या (Ed) सात पथकांनी उत्तर प्रदेशच्या बलरामपूरात (Balrampur) १२ ठिकाणी आणि मुंबईतील (Mumbai) दोन ठिकाणी छापे टाकले.

छांगूर बाबाला मुस्लीम देशांतून तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी धर्मांतरासाठी मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने देशभरातील एकूण १४ ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये बलरामपूर जिल्ह्यातील १२ ठिकाणांसह मुंबईतील वांद्रे आणि माहीममधील दोन ठिकाणांचा समावेश आहे. आज पहाटे ५ वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली. वांद्रे पूर्वेतील कनकिया पॅरिसच्या २०व्या मजल्यावरील फ्लॅट आणि माहिम पश्चिमेतील रिझवी हाइट्सच्या ५व्या मजल्यावरील फ्लॅटवर ही कारवाई करण्यात आली. छांगूर बाबाचा सहकारी नवीन याने शहजाद शेखच्या खात्यात दोन कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचे तपासात उघड झाले असून हे पैसे धर्मांतर रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंगचा भाग असल्याचा ईडीला संशय आहे.