Home / महाराष्ट्र / Shinde–Fadnavis : एकनाथ शिंदे-फडणवीसांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांंवरून वाद

Shinde–Fadnavis : एकनाथ शिंदे-फडणवीसांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांंवरून वाद

Shinde–Fadnavis -राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यातील अंतर्गत मतभेदांबाबत गेल्या सतत चर्चा सुरू आहेत. नगरविकास...

By: Team Navakal
Shinde–Fadnavis

Shinde–Fadnavis -राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यातील अंतर्गत मतभेदांबाबत गेल्या सतत चर्चा सुरू आहेत. नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यानंतर शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता शिंदे-फडणवीसांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या (Senior bureaucrats.)नियुक्त्यांंवरून वाद निर्माण झाला आहे.


फडणवीस यांनी ड वर्ग (D category)महापालिकांमध्येही आयएएस अधिकारी (IAS officers)नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नगरविकास विभागाने प्रचलित पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह धरला असून, त्यानुसार या महापालिकांवर मुख्याधिकारी अथवा राज्यसेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणे अपेक्षित आहे. अ, ब आणि क वर्ग महापालिकांवर यापूर्वीच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राज्यातील १९ ड वर्ग महापालिकांवर परंपरेनुसार बिगर सनदी अधिकारी (Non-IAS officers)कार्यरत होते.

आता या महापालिकांवरही सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश फडणवीस यांनी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या १९ महापालिकांमध्ये (19 municipal councils)साडेचार लाखांहून अधिक लोकसंख्या असून, तब्बल ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. याठिकाणी सनदी अधिकार्‍यांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू होताच नगरविकास विभागात फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप होत असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.


हे देखील वाचा

मोदींच्या मातोश्रींवरील व्हिडिओ; भाजपाचे काँग्रेसविरोधात आंदोलन

दागिन्यांसाठी अठरा कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी

फडणवीस ‘सक्षम’ मुख्यमंत्री ! संजय राऊतांची उपरोधिक टीका

Web Title:
संबंधित बातम्या