Elgar Parishad Bail Case : एल्गार परिषद प्रकरणात आरोपीला जामीन देऊनही त्याची सुटका न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)तुरुंग अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. आजच बिनशर्त माफीनामा (Unconditional apology)सादर करण्याचे निर्देश तळोजा कारागृह अधीक्षकांना दिले.
एल्गार परिषद प्रकरणात रमेश गायचोर (Activist Ramesh Gaichor) यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. पण ९ सप्टेंबरला सुटका न झाल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. गायचोर यांच्यातर्फे मिहिर देसाई (Advocates Mihir Desai) आणि संस्कृती याग्निक यांनी युक्तिवाद केला. त्यावरील सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी तुरुंग प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गायचोर यांना आपल्या वडीलांना भेटता यावे म्हणून अंतरिम जामिनाच्या तारखांमध्ये ९ ते ११ सप्टेंबर ऐवजी १६ ते १९ सप्टेंबर असा बदल करण्याची मागणी केली.
न्या. ए. एस. गडकरी (Justices A.S. Gadkari)आणि आर. आर. भोसले (R.R. Bhosale)यांच्या पीठासमोर गायचोर यांना ९ सप्टेंबरला ९ ते ११ सप्टेंबर (सायंकाळी सहापर्यंत) या काळासाठी तात्पुरता जामीन दिला होता. अटीशर्थींची पूर्तता केल्यानंतर ९ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता गायचोर यांना तुरुंगातून सोडून द्यायचे होते. पण न्यायालयाचा आदेश ४ सप्टेंबरला मिळाला. त्यानंतर न्यायालयाला सलग सुट्टी होती. गणेशोत्सवामुळे प्रशासकीय विभागांनाही सुट्टी होती. त्यामुळे गायचोर यांनी २५ हजारांच्या जातमुचलक्यासह रोख २५ हजार रुपये तळोजा तुरुंगात जमा करण्यास उशीर झाला. त्यांनी ९ सप्टेंबरला ही पूर्तता केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंग प्रशासनाने (Prison authorities)सुटकेसाठी सत्र न्यायालयातून वॉरंट आणण्याचा आग्रह धरला. यावरूनच न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाने जामीन आदेश दिल्यानंतर सत्र न्यायालयातून रिलीज बाँड आणण्याची गरज होती का, असा सवाल केला. तुरुंग अधीक्षकांचे हे वर्तन उद्धट असून त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे, असे न्यायालयाने खडसावले. सरकारी वकिलांनी गैरसमजातून (Misunderstanding) हा प्रकार घडल्याचे सांगत तुरुंगाधिकाऱ्यांचा माफीनामा गुरुवारी सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.
हे देखील वाचा –
‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
‘पैसे घेऊन माझ्याविरोधात…’; नितीन गडकरी यांचा मोठा आरोप
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून आता थेट CRPF ने पाठवले पत्र; ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार