कोल्हापुरात शक्तिपीठ समर्थनार्थशेतकऱ्यांचा मोर्चा! घोषणाबाजी

shakti peeth mahamarg


कोल्हापूर – नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गावरून (Nagpur–Goa Shaktipeeth Highway)कोल्हापूरमध्ये वातावरण आता अधिकच तापू लागले आहे. एकीकडे या प्रकल्पाला जिल्हयातील शेतकऱ्यांनी (farmers)कडाडून विरोध केला असताना दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी आज हातात सात-बारा उतारे (Satbara) घेऊन शक्तिपीठच्या समर्थनार्थ (support)कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली.


शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक आणि हातात आपापल्या जमिनीचे सात-बारा उतारे घेऊन हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध नाही. फक्त आमच्या जमिनींचा योग्य मोबदला आम्हाला मिळावा, एवढीच आमची मागणी आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात आमचेही योगदान (economic growth and better connectivity) असावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो आहोत,अशी माहिती मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी दिली.


शक्तिपीठ महामार्गामुळे १२ जिल्ह्यांतील शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासून शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे. कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यातील शेतकरी आणि स्थानिक नेते या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करीत आहेत. कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा विरोध पाहून या जिल्ह्याला वळसा घालून शक्तिपीठ महामार्ग करावा,असा विचार शासनपातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातीलच काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने एकूणच या प्रकल्पावरून संघर्ष वाढण्याची लक्षणे दिसत आहेत.