Mumbai-Pune Festival Trains: नवरात्री, दसरा, आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांदरम्यान वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने नागपूर-पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)-नागपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना सहजपणे तिकीट मिळवणे शक्य होणार आहे.
पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष ट्रेन
- ट्रेन क्र. 01209 ही नागपूर ते पुणे दर शनिवारी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत धावेल. ही ट्रेन रात्री 7:40 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता पुण्याला पोहोचेल.
- ट्रेन क्र. 01210 ही पुणे ते नागपूर दर रविवारी 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत धावेल. ही ट्रेन दुपारी 3:50 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता नागपूरला पोहोचेल.
- या मार्गावर एकूण 20 फेऱ्या (प्रत्येक दिशेने 10) चालवल्या जातील.
- महत्त्वाचे थांबे: उरुळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, आणि वर्धा.
लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर सुपरफास्ट स्पेशल
- ट्रेन क्र. 02139 ही लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नागपूर दर गुरुवारी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत धावेल. ही ट्रेन रात्री 12:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता नागपूरला पोहोचेल.
- ट्रेन क्र. 02140 ही नागपूर ते मुंबई (LTT) दर शुक्रवारी 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत धावेल. ही ट्रेन दुपारी 1:30 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4:10 वाजता मुंबईला पोहोचेल.
- या मार्गावर एकूण 20 फेऱ्या (प्रत्येक दिशेने 10) चालवल्या जातील.
- महत्त्वाचे थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, आणि वर्धा.
या विशेष गाड्यांसाठी नागपूर-पुणे मार्गाचे बुकिंग 8 सप्टेंबर 2025 पासून, तर मुंबई-नागपूर मार्गाचे बुकिंग 9 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
‘Bigg Boss 19’ मध्ये होणार अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? मजेशीर व्हिडिओ शेअर करत म्हणाली..
कर्करोगाच्या उपचारात क्रांती; रशियाने आणली नवीन ‘ही’ विशेष लस