बीड – मराठा समाजाला (Maratha community)ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता आंतरवलीतून (Antarwali) मुंबईला निघायचे. आंदोलनात जाळपोळ किंवा दगडफेक करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तरीही आपण मुंबईत गणपती बाप्पाला (Ganpati) घेऊन गुलाल उधळायचा,असा ठाम निर्धार आज मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केला.
बीडच्या मांजरसुंबा (Manjarsumba) येथे झालेल्या सभेत जरांगे यांनी आरक्षणाच्या तयारीची शेवटची आढावा सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या सभेतील डीजे बंद करण्यास सांगितल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये. पोलीस अधिकाऱ्यांच्या (police officers) खांद्यावरून बंदूक चालवू नये. तुम्हाला फडणवीसांचे आदेश आहेत का? सत्ता आणि सरकार (governments)बदलत असते, हे लक्षात ठेवा. डीजे बंद करून दंगल घडवण्याचा प्रयत्न हा फडणवीस यांचे षडयंत्र आहे. सभेत डीजे (DJ) बंद केला, तर बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही. तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना डाग लागू शकतो आणि तुमचे करिअर उद्ध्वस्त होईल.
पुढे ते म्हणाले की, महायुती सरकारमध्ये (Mahayuti government)एक तात्या आणि दोन आप्पा बसले आहेत. फडणवीस यांनी जातींमध्ये भांडणं लावली आहेत. आरक्षणासाठी ही माझी शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही पण मुंबई ही न्यायाची भूमी आहे. आम्ही तिकडे न्यायासाठी येत आहोत कोणाला त्रास द्यायला येत नाही. आंदोलनात जाळपोळ किंवा दगडफेक करण्यासाठी विरोधकांची लोक येतील. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावे आणि जो दगडफेक करेल त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या . शांततेने मुंबईच्या (Mumbai)दिशेला मोर्चा घेऊन जायचा.