गणपती उत्सवासाठी रेल्वेची मोठी घोषणा! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता 296 विशेष गाड्या धावणार

Ganpati Special Trains

Ganpati Special Trains: कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांना दरवर्षी वेध लागतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने आधीच 250 गणपती विशेष ट्रेन (Ganpati Special Trains) जाहीर केल्या होत्या. आता प्रवाशांची वाढती मागणी पाहता मध्य रेल्वे 44 नवीन गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. यामुळे एकूण ट्रेनची संख्या 296 झाली आहे.

नव्या 44 ट्रेनमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड हे द्वैसाप्ताहिक मार्ग असून 8 सेवा असतील. 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान गुरुवार आणि रविवारी ही ट्रेन चालेल. सकाळी 8:45 वाजता टिळक टर्मिनसहून सुटणारी ट्रेन रात्री 10:20 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परत रात्र 11:20 वाजता सावंतवाडीहून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता टिळक टर्मिनसला येईल. ठाणे, पनवेल, रत्नागिरीसह अनेक थांब्यांचा समावेश आहे.

दिवा ते खेड या मार्गावर 36 सेवा असतील. 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी 1:40 वाजता दिव्याहून सुटणारी ट्रेन सायंकाळी 8:00 वाजता खेडला पोहोचेल. परत सकाळी 8:00 वाजता खेडहून निघून दुपारी 1:00 वाजता दिव्याला येईल. निळजे, पनवेल, रोहा हे थांबे असतील.

अनारक्षित ट्रेनमध्ये वाढ

दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित ट्रेनला दोन अतिरिक्त सेवा वाढवून संख्या 40 करण्यात आली आहे. 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन चालेल.

बुकिंग माहिती

गणपती विशेष ट्रेनच्या आरक्षणासाठी 3 ऑगस्ट 2025 पासून सर्व केंद्रे आणि www.irctc.co.in वर बुकिंग सुरू होईल. अनारक्षित कोचसाठी यूटीएस सिस्टम वापरता येईल. तर विशेष ट्रेनच्या थांब्यांचा तपशील www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपवर उपलब्ध आहे.

Share:

More Posts