Home / महाराष्ट्र / छत्रपती संभाजीनगरात सराईत गुंडाकडून मैत्रिणीवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगरात सराईत गुंडाकडून मैत्रिणीवर गोळीबार

Firing on girlfriend in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) मध्ये सैय्यद फैजल (Syed Faisal) उर्फ तेजा याने सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार(firing) केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत तेजाला अटक केली.

तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या हत्येचा प्रयत्न, बलात्कार (Rape), चोरी आणि अमली पदार्थ तस्करी संदर्भात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीतेजा हा रात्री उशिरा शहरातील किलेअर्क परिसरात आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. संतापाच्या भरात त्याने पिस्तूल काढून गोळीबार केला. त्यातील एक गोळी तरुणीच्या हाताला लागली.


जखमी तरुणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिक घटनास्थळी धावले, तोपर्यंत आरोपी घरातून पसार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तो म्हणाला की, मी बाहेर आल्यानंतर आणखी मुलींना मारणार आहे.